Advertisement Advertisement

घरांचा दरवाजा उघडा पाहून तो घरात घुसला..; ती गाढ झोपत होती अन् तो गेला…

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) : वेणी ता. लोणार येथे एका धक्कादायक घटनेत दरवाजा नसलेल्या टिनपत्राच्या झोपडीत रात्री झोपलेल्या ३४ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने विरोध केला असता आरोपीने तिला व तिच्या बहिणीला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

पीडिता ही आपल्या मुलांसमवेत झोपलेली असताना घराला दरवाजा नसल्याचा गैरफायदा घेत आरोपी अभिमन्यू वाघमारे (रा. वेणी) याने घरात प्रवेश केला व विनयभंग केला. आरडाओरड केल्याने पीडितेची बहीण मदतीसाठी धावून आली असता, आरोपीने दोघींनाही मारहाण करत अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून मेहकर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३३, ७४, ११५ (२), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकृष्ण गवई करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!