उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज):भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अॅपेला धडकून पलटी झाली.
या भीषण अपघातात कारमधील दोन जण व अॅपेतील एक व्यक्ती जखमी झाले आहेत.ही घटना १७ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास शहराबाहेर घडली. अमडापुरहून (एमएच २८ बीक्यू … क्रमांकाची) कार चिखलीकडे येत असताना हा अपघात झाला.
नियंत्रण सुटल्याने कारने (एमएच २८ आर ८७६ क्रमांकाच्या) उभ्या अॅपेला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार पलटी झाली.अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात कार व अॅपेचेही मोठे नुकसान झाले आहे. वृत्त लिहिपर्यंत जखमींची नावे समजू शकली नव्हती.













