Advertisement Advertisement

चिखलीत आंबेडकरी चळवळीला धक्का; भाई विजय गवई यांची आत्महत्या….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई (४६) यांनी १८ ऑगस्ट रोजी गजानन नगर येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

विजय गवई हे गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरसह विविध आजारांशी झुंज देत होते. आजारपणामुळे त्यांची प्रकृती मागील काही काळापासून खालावत होती. राहेरी येथील लॉन्ग मार्च स्मृती सोहळ्याशी ते अखेरपर्यंत जोडलेले होते.

गवई यांनी दलित मुक्तीसेनेचे तिसरे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर त्यांनी प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीत सक्रियपणे काम केले. सामाजिक प्रश्नांवर आंदोलने उभारून त्यांनी विविध प्रश्नांना वाचा फोडली.

सामाजिक कार्यासोबतच त्यांनी राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी दोन वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढविली होती. २०१२ मध्ये इसोली सर्कलमधून झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता.

गेल्या काही वर्षांपासून आजारपणामुळे त्यांची प्रकृती खालावत असतानाच त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मनीषा, मुलगी स्नेहल आणि मुलगा सनी असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!