Advertisement Advertisement

पोरीला एकटी गाठलं अन् घडलं धक्कादायक; संशयित आरोपीला अटक! चिखली तालुक्यातील घटना…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बुधवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास चिखली तालुक्यातील एका गावात येथील स्मशानभूमीच्या पाठीमागील नाल्याजवळ गेली होती. यावेळी संशयित आरोपीने तिचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. तरुणीच्या दिव्यांगपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांकडे केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी शेख रब्बानी शेख गणी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, दिव्यांग तरुणीवरील या कथित अत्याचाराच्या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!