BULDHANA NEWS: “बुलढाण्यात सहकार क्षेत्राला मोठा झटका..! १३ पतसंस्थांचे परवाने कायमचे रद्द”….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडवणारी मोठी कारवाई सहकार विभागाने केली आहे. आर्थिकदृष्ट्या पूर्णतः डबघाईला आलेल्या, वर्षानुवर्षे फक्त कागदावरच चालू असलेल्या १३ सहकारी पतसंस्थांची नोंदणी (परवाना) कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची जिल्ह्यातील सर्वात कठोर कारवाई मानली जात आहे.

या सर्व पतसंस्थांवर यापूर्वीच अवसायक (लिक्विडेटर) नेमण्यात आले होते. मालमत्ता, देणी-घेणी व व्यवहारांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर सहकार विभागाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ अंतर्गत अंतिम नोटीस बजावली आहे. त्यामुळे या संस्थांचे कायदेशीर अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

परवाना रद्द होणाऱ्या १३ सहकारी पतसंस्थांची यादी :

विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था, बुलढाणा

विदर्भ नागरी सहकारी पतसंस्था, बुलढाणा

धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, बुलढाणा

प्रियदर्शिनी महिला नागरी सहकारी पतसंस्था, बुलढाणा

लोककल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था, बुलढाणा

पिपल्स अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, बुलढाणा

अहिल्या पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था, बुलढाणा

शिवप्रताप ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, बुलढाणा

सन्मित्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था, बुलढाणा

जि. प. माध्यमिक शिक्षक व कर्मचारी पतसंस्था, बुलढाणा

भाग्योदय ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, देऊळघाट

कामेश्वर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, वरवंड

म. ज्योतिबा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, रायपूर

नोंदणी रद्द झाल्यानंतर वर्षानुवर्षे रखडलेल्या अवसायक प्रक्रियेला गती मिळणार असून, सहकार विभागाला पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करणे सोपे होणार आहे. मात्र, या कारवाईमुळे ठेवीदार व सभासदांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आर्थिक अनियमितता करणाऱ्या इतर पतसंस्थांनाही हा जोरदार धक्का व कडक इशारा मानला जात आहे.

ही महत्त्वाची बातमी ठेवीदार व सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!