रणगाव शिवारात ट्रॅक्टरखाली दबून २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मलकापूर तालुक्यातील रणगाव शिवारात ट्रॅक्टरखाली दबून एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी २०२६ रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मृतकाचे नाव मल्हार विनोद फासे (वय २०), रा. हिंगणकाझी, ता. मलकापूर असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणगाव शिवारात काम सुरू असताना अचानक ट्रॅक्टरखाली दबल्याने मल्हार फासे गंभीर जखमी झाला. घटनेनंतर नातेवाईकांनी व शेतमजुरांनी तत्काळ त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे दाखल केले.

मात्र, रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी तपासणी करून मल्हार फासे यांना मृत घोषित केले. सदर घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. स्वाती पाटील यांच्या वतीने वॉर्ड बॉय राजू तुकाराम गोमटे (वय ५२) यांनी पोलिसांना दिली.

या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. तरुण वयात काळाने झडप घातल्याने फासे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!