खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा कव्हरेज न्युज): हिवरा बु येथे स्वयंप्रेरणेने शेतकरी महिलांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.खामगाव तालुक्यातील हिवरा बु येथे २० सप्टेंबर रोजी शेतकरी महिला सौ सुरेखा संतोष घोराडे यांनी स्वयंप्रेरणेने आपल्या शेतात शेतकरी महिलांची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये उपस्थित शेतकरी महिला यांना तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी मार्गदर्शन केले.शेतकरी गट व गटशेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचे उत्पन्न वाढवून कुटुंबाचा विकास कसा करता येईल असेही पवार यांनी उपस्थित महिला शेतकरी यांना सांगितले. सौ घोराडे यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना आपल्या शेतातील नाविन्यपूर्ण प्रयोगांची प्रत्यक्ष भेटीद्वारे माहिती दिली. या कार्यशाळेला मंडळ कृषी अधिकारी एस.टी.धुमाळ,संजय अटक, सहायक कृषी अधिकारी बी. जे. हंडाळ यांच्यासह शेतकरी महिला उपस्थित होत्या.
हिवरा बु येथे ‘स्वयंप्रेरणेने शेतकरी महिलांची’ कार्यशाळा आयोजित..!
Published On: September 22, 2025 6:46 pm















