जन्मदात्या बापाने केला अकरा वर्षाच्या मुलीवर….! – आईने झाऱ्याने फोडले हात, पोलिसांत गुन्हा दाखल!

जन्मदात्या बापाने केला अकरा वर्षाच्या मुलीवर….! – आईने झाऱ्याने फोडले हात, पोलिसांत गुन्हा दाखल!

छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथे बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत नराधम पित्याने आपल्या ११ वर्षीय मुलीसोबत अश्लील प्रकार केला. हा प्रकार कळताच मुलीच्या आईने संतापाच्या भरात पतीचे हात झाऱ्याने अक्षरशः झोडून काढले. त्यामुळे त्याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली.

मुलीच्या आईने वाळूज एमआयडीसी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून, आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पशु किसान क्रेडिट कार्ड योजना; शेतकऱ्यांसाठी पशुपालन कर्ज, पहा पात्रता, व्याजदर आणि अर्ज प्रक्रिया

घटनेचे तपशील असे की, पीडित मुलगी पाचवीत शिकते. बुधवारी (२० ऑगस्ट) सकाळी मुलीची आई बचत गटाचा हप्ता भरण्यासाठी बाहेर गेली होती. घरी परतल्यावर तिने मुलगी गॅलरीत घाबरलेल्या अवस्थेत उभी असल्याचे पाहिले. चौकशीअंती मुलीने सांगितले की, पप्पांनी कपडे काढले.

हा प्रकार ऐकून हादरलेल्या आईने पतीला जाब विचारला असता त्याने “दारू पिल्यामुळे काही समजले नाही” असे उत्तर दिले. त्यानंतर संतापलेल्या आईने आई व बहिणीच्या मदतीने आरोपी पतीचे हात झाऱ्याने फोडले.

त्यानंतर पीडित मुलीसह वाळूज पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!