लोणार-मेहकर मार्गावर भीषण अपघात: एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी; पावसाने रस्त्यावर आलेल्या मातीमुळे घडली दुर्घटना…

लोणार-मेहकर मार्गावर भीषण अपघात: एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी; पावसाने रस्त्यावर आलेल्या मातीमुळे घडली दुर्घटना...

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्यूज): लोणार-मेहकर मार्गावरील वडगाव तेजन परिसरात गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. पावसामुळे रस्त्यावर आलेल्या मातीमुळे कार अनियंत्रित होऊन पलटी झाली. या दुर्घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या बांधावर आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव; मेहकर – लोणार तालुक्यातील या गावात जाणार…!

मिळालेल्या माहितीनुसार, लोणार येथील रहिवासी आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शुभम बनमेरु हे आपल्या मित्रांसोबत कार (क्रमांक: MH 28 BW 0959) मधून मेहकर येथे काही कामानिमित्त गेले होते. रात्री परत येत असताना वडगाव तेजन परिसरात जोरदार पाऊस झाला होता. यामुळे नदी-नाल्यांमधील रेती आणि माती रस्त्यावर आली होती. रस्त्याची खराब अवस्था आणि मातीमुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली.

या अपघातात ऋषभ बाबूलाल बगडीया (वय २६, रा. लोणार) याचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम बनमेरु यांच्यासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी लोणार पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!