चिंचपूरच्या नवरदेवांची वरात थेट पोलीस ठाण्यात!; ठाणेदार कैलास चौधरी यांची कडक कारवाई… मॅटर काय झालं वाचा बातमीत..

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्न म्हटलं की आनंद, मिरवणूक आणि जल्लोष… पण हा जल्लोष कायद्याच्या चौकटीत नसेल, तर तो थेट पोलीस स्टेशनच्या दारात घेऊन जातो, हे चिंचपूर गावातील दोन नवरदेवांनी अनुभवले.

राहुल राजेंद्र रोळे (२८) याचे लग्न १९ मे रोजी होते. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे १८ मेच्या रात्री त्याने गावातून मोठ्या थाटात मिरवणूक काढली. यात त्याने तलवार हातात घेऊन डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या व्हिडिओमुळे अजून एक नवरदेव अडचणीत सापडला. संकेत इंगळे (२७) याचे लग्न २० मे रोजी होते. त्यानेही १९ मे रोजी मिरवणूक काढताना तलवार हातात घेतली आणि ठसक्यात डान्स केला. त्याचेही व्हिडिओ व्हायरल झाले.

हे दोन्ही प्रकार हिवरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास चौधरी यांच्या लक्षात आले. त्यांनी कुठलीही ढिलाई न करता दोन्ही नवरदेवांना लग्नाच्या आदल्याच दिवशी अटक केली. परिणामी, नवरदेवांच्या हातावरची मेहंदी सुकण्याआधीच त्यांनी रात्रभर लॉकअपची हवा खाल्ली.

शेवटी, न्यायालयात हजर केल्यानंतर २० मे रोजी या दोघांची जामीनावर सुटका करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!