Advertisement Advertisement

पळसखेड चक्का शिवारात दुचाकीचा अपघात; १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू! आठ दिवसांनंतर दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल….

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील पळसखेड चक्का शिवारात पुलाजवळ झालेल्या दुचाकी अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश अंकुश साळवे (वय १८, रा. चिंचोली जहांगीर, ता. सिंदखेड राजा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातप्रकरणी दुचाकीचालक दीपक पंपळे याच्याविरुद्ध सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी १३ ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दिली.

मृत गणेशचे वडील अंकुश तातोबा साळवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी ते पत्नी आणि मुलगा गणेश यांच्यासह बाजारासाठी सिंदखेड राजा येथे आले होते. यावेळी त्यांच्या गावातील दीपक पंपळे हा गणेशला सोबत घेऊन गेला. दरम्यान, सायंकाळी साडेचारच्या सुमारास पळसखेड चक्का गावाजवळील पुलाच्या परिसरात त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात गणेश गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच गणेश आणि दीपक यांना सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून गणेशला मृत घोषित केले. तरुण मुलाच्या मृत्यूमुळे साळवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून सिंदखेड राजा पोलिसांनी दुचाकीचालक दीपक पंपळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८१ आणि १०६(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताची नेमकी परिस्थिती आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा पुढील तपास सिंदखेड राजा पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!