Advertisement Advertisement

देऊळगाव महीत खळबळ! ३२ वर्षांची विवाहित महिला बेपत्ता, पती म्हणतो ‘तिला पळवून नेलं!’

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील ३२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला एका व्यक्तीने पळवून नेल्याचा आरोप तिच्या पतीने तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे देऊळगाव राजा पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर महिलेच्या पतीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. या तक्रारीवरून ११ ऑक्टोबर रोजी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

बेपत्ता महिलेची उंची सुमारे १६२ सेंटीमीटर असून, तिने नववीपर्यंत शिक्षण घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहेत. बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासह प्रकरणातील विविध बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!