Advertisement Advertisement

चिखलीत आगीचं तांडव, दुकानाचा झाला कोळसा! सातबारा सेंटर जळून खाक! रात्री साडेदहाच्या सुमारास आगीचा भडका! शेजारच्या दुकानांनाही बसला जोरदार चटका…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली बसस्थानकाजवळ असलेल्या सागर वाघ यांच्या सातबारा ऑनलाइन कॉम्प्युटर सेंटरला मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून, शेजारील दुकानांचेही नुकसान झाले आहे. आगीचे प्राथमिक कारण शॉर्टसर्किट असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने सागर वाघ यांच्या दुकानातील साहित्य जळून खाक झाले. आगीची झळ शेजारील दुकानांनाही बसल्याने तेथील व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, आग आटोक्यात आली असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा समोर आलेला नाही. सातबारा ऑनलाइन कॉम्प्युटर सेंटर पूर्णपणे जळाल्याने सागर वाघ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक चित्र आहे. आगीच्या घटनेमुळे चिखली शहरातील व्यावसायिक परिसरात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!