Advertisement Advertisement

जुना वाद उफाळला अन् कुटुंबाला धरून धोपटलं! ब्रह्मपुरीत महिलेसह पतीला मारहाण; चौघांवर गुन्हा….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे जुन्या वादाच्या कारणावरून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण करून धमकी दिल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत कोमल अर्जुन धंदर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, जुन्या वादाच्या कारणावरून संजय तुळशीराम गुंजकर, प्रकाश साहेबराव गुंजकर, विलास महादू गुंजकर आणि गणेश प्रल्हाद धनवटे यांनी वाद घालत धंदर कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, आरोपींपैकी विलास महादू गुंजकर यांनी काठीने फिर्यादीचे पती अर्जुन धंदर यांच्या डोक्यावर तसेच डाव्या हातावर मारहाण करून त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच इतर आरोपींनीही मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.या घटनेनंतर आरोपींनी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

फिर्यादीच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!