Advertisement Advertisement

दुचाकीवरून जात होता कामाला, वाटेतच घातला घोळ! तरुणाला अडवून मारहाण; पाच जण पोलिसांच्या रडारवर…

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज): कामानिमित्त दुचाकीवरून जात असलेल्या ३१ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांसह दगडाने मारहाण केल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास नागणगाव टी पॉईंट, खैरव परिसरात घडली. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अंढेरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर नंदाजी सोसे (वय ३१, रा. खैरव) हे कामानिमित्त दुचाकीवरून जात होते. नागणगाव टी पॉईंट परिसरात आल्यानंतर त्यांना अडवून आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर काही आरोपींनी दगडानेही मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

मारहाणीनंतर आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही मनोहर सोसे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत कारवाई केली.

या प्रकरणी निवृत्ती बद्रीनाथ सोसे, शिवानंद विठोबा सोसे, विठोबा रंगनाथ सोसे, बद्रीनाथ कुंडलिक सोसे आणि माणिकराव कुंडलिक सोसे (सर्व रा. खैरव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), १८९, १८९(२), १९०, १९१(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंढेरा ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!