खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : खामगाव तालुक्यातील घारोड शिवारात शनिवारी (१६ ऑगस्ट) संध्याकाळी साधारण चार वाजता वीज कोसळून एक शेतकरी महिलेचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
मृत महिलेचे नाव सौ. कांताबाई दिगांबर परकाळे (वय ५५, रा. घारोड) असे आहे. त्या शेतात मजुरी करून परत येत असताना ही घटना घडली.सोबत असलेल्या सौ. कोकिळाबाई प्रकाश परकाळे (वय ५०) व सौ. दुर्गा भगवान खोमणे (वय ३४, रा. घारोड) या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.