चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील भरोसा या गावात काही दिवसांपूर्वी शेतकरी गणेश थुट्टे आणि त्यांच्या पत्नी रंजना थुट्टे यांनी आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असताना देखील बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री अद्याप या कुटुंबाला भेट द्यायला पोहोचलेले नाहीत, ही खंत आता सर्वसामान्य जनतेत तीव्रतेने व्यक्त केली जात आहे.शेतकऱ्यांच्या व्यथा, आत्महत्येच्या बातम्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरू असतानाही जिल्ह्याचा “पालक” म्हणून ज्या व्यक्तीकडे जनतेने अपेक्षेने पाहावं, तेच आज या दुःखद प्रसंगात अनुपस्थित आहेत – हे अत्यंत वेदनादायक आहे.दुसरीकडे, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत भरोसा गावात येऊन थुट्टे कुटुंबाच्या दु:खात सहभाग नोंदवला.पण जिल्ह्याचे जबाबदार पालकमंत्री अजूनही या गावात पोहोचलेले नाहीत. असा मोठा प्रश्न निर्माण होतो की, “पालक”मंत्री हे केवळ पदावरचे नावाचे पालक आहेत का?”या घटनेने शेतकरी आत्महत्येचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला आहे आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज शेतकरी अडचणीत असताना त्याच्या मदतीसाठी, पाठबळासाठी, त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी कोण उभं राहतं आणि कोण दूर राहतो – हे जनतेला चांगलं समजतं.थुट्टे दांपत्याच्या आत्महत्येनंतर केवळ फोटो काढणं, गोड बोलणं आणि आश्वासनं देणं हे पुरेसं नाही, तर तातडीने मदत, जबाबदारीची जाणीव आणि संवेदनशीलता दाखवणं आवश्यक आहे.आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष यावर आहे की पालकमंत्री यापुढे तरी या घटनेकडे गांभीर्याने पाहतात का, की अजूनही गप्प राहतात?
शेतकरी दांपत्याची आत्महत्या… पण जिल्ह्याचे पालकमंत्री अद्याप गायब!भरोसा येथील हृदयद्रावक घटनेने जिल्हा सुन्रा.. राजकीय भेटी सुरू…
Updated On: July 31, 2025 10:33 am