शेळगाव आटोळ येथे पुराच्या पाण्यात वाहून तरुणाचा मृत्यू….

पतीकडून घरासाठी पैशांची मागणी, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पेनटाकळी धरणात उडी घेत संपवले जीवन

शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ गावात १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत चेतन वसंता बोर्डे (वय २०) हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला. गावकऱ्यांनी जवळपास तीन तास शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला.

BSF हेड कॉन्स्टेबल भरती! 1121 जागांसाठी ऑनलाइन अर्ज, काय आहे पात्रता?

प्राप्त माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास मिसळवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे नदीला पूर आला होता. चेतन आपल्या बकऱ्यांसाठी पाला आणण्यासाठी शिवारात गेला होता. तेव्हा पाय घसरून तो थेट नदीपात्रात कोसळला आणि पुराच्या प्रवाहात वाहून गेला.

5 वर्षांत 1 कोटी रुपये कसे कमवायचे? मुलाच्या भविष्यासाठी खास रणनीती!

गावकऱ्यांना ही माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांनी पाण्यात उतरून शोधमोहीम राबवली. अखेर सुभाष मिसार यांच्या शेताजवळील बंधाऱ्याजवळ सुरज निकाळजे यांना चेतनचा मृतदेह आढळून आला. तत्काळ त्याला दवाखान्यात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेने शेळगाव आटोळ गावावर शोककळा पसरली आहे. चेतनच्या पश्चात आई-वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!