Advertisement Advertisement

सकाळी घरातून निघाली ती अजून घरी आलीच नाही! ३५ वर्षीय महिला बेपत्ता…

खामगाव (बुलढाणा कव्हरेज न्युज): शहरातील गोपाल नगर परिसरात राहणारी ३५ वर्षीय महिला संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला २० ऑगस्ट रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, दिवसभर उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा नातेवाईकांकडे तसेच विविध ठिकाणी शोध घेतला. परंतु तिचा कुठेही मागोवा लागला नाही.

अखेर कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी मिसिंगची नोंद करून महिलेचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार आगरकर करीत आहेत.

दरम्यान, संबंधित महिलेबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!