कळस कृषी प्रदर्शनात देऊळगाव महीचे अंकुश पऱ्हाड यांना ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय युवा उद्योजक’ पुरस्कार….

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज):१० जानेवारी २०२६ रोजी कळस कृषी प्रदर्शन, संगमनेर जि. अहिल्यानगर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात भुमिपुत्र कृषी केंद्र, देऊळगाव मही चे संचालक श्री. अंकुश पऱ्हाड साहेब यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय ‘युवा उद्योजक’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

हा पुरस्कार महाराष्ट्र फर्टीलायझर डिलर्स असोसिएशन चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. विनोद भाऊ तराळ, राज्य उपाध्यक्ष श्री. विवेक भाऊ कासार तसेच नाशिक मतदारसंघाचे माजी आमदार श्री. सुधीरजी तांबे साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

देऊळगाव मही येथे कार्यरत असलेल्या भुमिपुत्र कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, दर्जेदार खते व मार्गदर्शन उपलब्ध करून देत अंकुश पऱ्हाड यांनी अल्पावधीतच नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे ते आता युवा उद्योजक म्हणून राज्यभर ओळखले जाऊ लागले आहेत.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, देऊळगाव मही परिसरासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!