पोषण आहार वितरित करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू..

माजी सैनिकांचे उन्हाळी अधिवेशन २५ मे रोजी सिंदखेडराजा येथे; माँ जिजाऊ सृष्टीवर महाराष्ट्रभरातील माजी सैनिकांची उपस्थिती अपेक्षित!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलडाणा तालुक्यातील हातनी-रायपूर मार्गावर झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना १९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाड्यांसाठी पोषण आहार घेऊन जाणारे चारचाकी वाहन (क्रमांक एमएच ४१ सी ७२४०) हातनीहून रायपूरकडे जात होते. दरम्यान, रायपूर येथील पेट्रोलपंपाजवळील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.


या धडकेत दुचाकीवरील मुबारक शहा सलीम शहा (वय २८, रा. रायपूर) हा युवक गंभीर जखमी झाला. तो रायपूर बसस्थानकावरून पांगरी फाट्याकडे जात होता. अपघातानंतर स्थानिकांनी त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेने रायपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!