संडासला गेला अन् परतलाच नाही…! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला…

बिबी (बुलडाणा कव्हरेज न्यूज) मेहकर-लोणार तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या संततधार पावसामुळे नाले ओसंडून वाहत आहेत. अशात लोणार तालुक्यातील महार चिकणा फाट्याजवळ एक दुर्दैवी घटना घडली. रोहिदास श्रावण शिरसाट (वय २६, रा. दादुलगव्हाण) हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. आज सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला.

रोहिदास पवन वाईन बार (महार चिकणा फाटा) येथे कामाला होता. आज सकाळी १० वाजता तो बारशेजारील संडासला गेला होता. संडासशेजारी असलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. पावसाचे प्रमाण आणि नाल्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात पडून वाहून गेला.

दुपारी बराच वेळ झाला तरी रोहिदास परत न आल्यामुळे बार मालक व गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. काही वेळातच पोलिसांना माहिती देण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ, महसूल विभागाचे कर्मचारी व पोलिस यांनी संयुक्तरीत्या शोधमोहीम राबवली. अखेर आज सायंकाळी ६ वाजता त्याचा मृतदेह नाल्याजवळील पुलाजवळ सापडला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाने नागरिकांना पुराच्या काळात नाल्याजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!