Advertisement Advertisement

पैशे घेऊन ये, गाडी घ्यायची हाय!” म्हणत विवाहितेचा छळ; मारहाण-शिवीगाळ केल्याची तक्रार, चौघांवर गुन्हा!

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मोटारसायकल घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरशेवली (ता. चिखली) येथील व सध्या निमखेड (ता. मोताळा) येथे राहणाऱ्या प्रियंका गजानन राठोड (वय २६) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या पतीसह सासरच्या मंडळींकडून मोटारसायकल घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणण्याची मागणी केली जात होती.ही मागणी पूर्ण न झाल्याने घरगुती क्षुल्लक कारणांवरून वारंवार मारहाण करणे, शिवीगाळ करणे तसेच मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी गजानन राजू राठोड, नर्मदा राजू राठोड, विजय राजू राठोड (रा. डोंगरशेवली, ता. चिखली) आणि निकिता आकु चव्हाण (रा. गिलोरी, ता. मोताळा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकांत चिटवार करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!