डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – शासनाच्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. या महिलांसाठी असलेल्या योजनेचा गैरफायदा घेत १४ ते १५ हजार पुरुषांनी २१ ते २२ कोटी रुपये उचलले, असा गंभीर आरोप माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केला आहे.
सावजी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून, याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) करावा, अशी मागणी केली आहे.
काय आहे प्रकार?
सुबोध सावजी म्हणाले की, “लाडकी बहीण योजना ही केवळ महिलांसाठी आहे. मात्र, हजारोंच्या संख्येने पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला. शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून २१ ते २२ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला. हे अत्यंत गंभीर असून, यामागे काही अधिकारी आणि दलालांचे रॅकेट कार्यरत असावे, असा संशय आहे.
“कोणती मागणी केली?
सावजी यांनी निवेदनात पुढील गोष्टींची मागणी केली आहे:या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून तात्काळ करण्यात यावा.१४ ते १५ हजार पुरुष व त्यांचे अर्ज भरून देणाऱ्यांवर एफआयआर दाखल करावा.या प्रकरणातील संपूर्ण रक्कम व्याजासह परत वसूल करण्यात यावी.या अवैध लाभार्थ्यांची व संबंधित अधिकाऱ्यांची नावे जनतेसमोर जाहीर करावीत.”शेतकऱ्यांना मदत नाही, मात्र लाडकी बहीण योजनेत लूट”सावजी यांनी शासनावर निशाणा साधत म्हटले की, “अतिवृष्टीमुळे शेतकरी अजूनही आर्थिक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, लाडकी बहीण योजनेत करोडोंची लूट होत आहे. ही बाब सरकारमधील भ्रष्टाचाराचे लक्षण आहे.”