खामगावात चाललंय काय?गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची ‘सत्ता’ तरीही भाजपच्या कट्टर लोकांनाच उपोषण करण्याची वेळ येतेच कशी..? माजी आमदार सानंदा म्हणतात…!

खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा कव्हरेज न्युज):मंडळी खरं तर आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे.यातच सध्या खामगावात भाजपचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री सुद्धा आहेत.मग तरीही भाजपच्या लोकांनाच उपोषण करण्याची गरज काय..? असा प्रश्न नकीच आपल्याला पडला असेल हो न..? अन् तो पडणं ही स्वाभाविकच आहे बरं का..तर ऐका मग..!

निमित्त आहे..खामगावात वामन नगर येथील रेल्वे गेटवर बनत असलेल्या अंडरपास रोडचे काम बंद करा अन् रस्ता पूर्ववत सुरू करा यासाठी चालु असलेल्या उपोषणाचं हे उपोषण कोण करतंय? तर उपोषण कर्ते आहेत कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे माजी नगरसेवक महेंद्र रोहणकार १९ सप्टेंबर पासून रोहणकार हे खामगावात आमरण उपोषणाला बसले आहेत. आता फुंडकर यांच्या भाजप पक्षाचे कट्टर उपोषणाला बसले म्हटल्यावर माजी आमदार सानंदा टीका करणार नाहीत असं होणारच नाही.तर मग ऐका माजी आमदार सानंदा या उपोषणाला म्हणाले रोहणकार यांचे उपोषण म्हणजे जनतेची दिशाभूल करणारे थोटांग आणखी सानंदा म्हणतात.२०२४ ला हे रेल्वे गेट नागरिकांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. कोट्यावधी रुपयांच्या या कामात स्वतःचे आर्थिक हित साधले त्यानंतर परिसरातील जनता दिलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्याने रोष करीत असल्याचे पाहत आता स्व:हितासाठी पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रोहणकार यांचे उपोषण म्हणजे एक थोटांग आहे.असे सानंदा यांचं म्हणणं आहे.महेंद्र रोहणकार हे फुंडकर यांच्या अत्यंत जवळचे आहेत.या रेल्वे भुयारी मार्गाचे सिमेंट बांधकाम यासह भुयारी मार्ग खोदून मरून काढण्याचे काम नागपूरच्या एजन्सी मार्फत महेंद्र रोहणकार यांना मिळाले होते.त्यांच्या मशीनरी तिथे होत्या या कामावर नेहमी रोहणकार बंधू उपस्थित असायचे हे देखील सर्वश्रुत आहे.अंदाजे २० कोटी रुपयांच्या रेल्वे भुयारी मार्गाच्या कामावर आतापर्यंत अंदाजे ७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. भुयारी मार्गाचे उर्वरित काम जलद गतीने करण्याच्या मागणी ऐवजी सदर भुयारी मार्ग कायम स्वरूपात बंद करावे ही मागणी म्हणजे जनतेचे कोट्यावधी रुपये खड्ड्यात टाकण्याचा हा प्रकार आहे.अंदाजे दोन वर्षांपूर्वी आमदार आकाश फुंडकर यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उड्डाणपूला ऐवजी अंडरपास यशस्वी होईल असे पटवून दिले होते.त्यावेळी त्यांनी शासनाचे तीनशे कोटी रुपये वाचले असे वृत्त वाहिन्यांना मुलाखती सांगितले होते. मात्र अंदाजे २० कोटी रुपयांच्या या कामाला दोन वर्षात गती दिलीच नाही. उलट कामात अडथळा असलेल्या पाईपलाईनचे स्थानांतरण खामगाव नगर पालिकेत त्यांचे अज्ञाधारक मुख्य प्रशासक असताना देखील ही कामे करून घेतली नाहीत.आता त्यांच्याच पक्षाचे माजी नगरसेवक रोहणकार आमरण उपोषण करत असताना त्यांच्या उपोषणानंतर आता नामदार रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करीत आहेत. हीच चर्चा वेळेत केली असती तर खामगावकारांना दिलासा मिळून पर्यायाने आज होत असलेली महायुती सरकारची बदनामी थांबली असती. असा टोलाही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी लगावला आहे.मुख्य प्रशासक यांनी अडथळा ठरणारी पाईपलाईन स्थलांतरित करावी व संबंधित यंत्रणेने भुयारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी सानंदा यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!