शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) शेगाव शहरात विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपी तो आणि त्याची बहीण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, सचिनने तिला घरी बोलावून चहामध्ये गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दीर्घकाळ अत्याचार सुरू ठेवले. या प्रकारात आरोपीच्या बहिणीनेही त्याला साथ दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 523/2025 नोंदवला असून, भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 64(2)(m), 351(2), 3(5) अंतर्गत कारवाई सुरू आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बारींगे करत आहेत.











