या प्रकरणामुळे गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही जसाच तसाच आहे… त्यामुळे गावातील नागरिकांनी ज्या सुज्ञ युवा नेतृत्वांना संधी देऊन गाव विकासाचे पहारेकरी बनविले त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.
फक्त खादीचे कपडे घालून मिरवत बसण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी किंबहुना सोडवण्याची जबाबदारी ही स्वीकारावी असा नाराजीचा सूर गावकऱ्यांमधून येत असल्याची माहिती आहे. लवकरच या आरो फिल्टर बाबत ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन केले नाही तर संभाजी ब्रिगेड कडून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष राहुल संबारे यांनी दिली आहे..