बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)७ महिन्यांत ७१६ कारवाया, ८ कोटींपेक्षा जास्त दंड वसुलजिल्हाभरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावर महसूल प्रशासनाने गेल्या सात महिन्यांत मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. या कालावधीत एकूण ७१६ कारवाया करण्यात आल्या.
यामध्ये — ८ कोटी २९ लाख ३४ हजार १९८ रुपये दंड ठोठावण्यात आला.४५ जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले.आतापर्यंत ७ कोटी १० लाख ७३ हजार रुपये दंड वसुल.१ कोटी १८ लाख ६० हजार ५०० रुपयांचा दंड वसुलीची प्रक्रिया सुरू.महसूल विभागाच्या मोहिमेत २,०९२ ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. यापैकी ६९२ लाभार्थ्यांना घरकुल बांधणीसाठी मोफत वाळू वाटप करण्यात आली.
ही मोहीम बुलढाणा, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर, मलकापूर, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा आणि चिखली तालुक्यांत राबविण्यात आली.महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, रेती तस्करांविरुद्धची कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहील.