भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला ठोकर; परीक्षेला निघालेली तरुणी जागीच ठार…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव–विहिगाव मार्गावर किन्ही महादेवजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर बसलेली १९ वर्षीय विद्यार्थिनी ठार झाली. भरधाव ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

उमरा अटाळी येथील गौरी सुरेश महानकर (वय १९) ही विद्यार्थिनी आज सकाळी परीक्षा देण्यासाठी मैत्रिणीसोबत दुचाकीने अंत्रज येथे जात होती. दुचाकी मैत्रिणीचा भाऊ चालवत होता. किन्ही महादेव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक दुचाकीला धडक दिली.

या अपघातात गौरी गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. अपघातात गौरीची मैत्रीण आणि दुचाकीचालक तरुण हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच गौरीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!