चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील बेराळा येथील ग्रामसेवकाने आपल्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांना हैराण करून सोडले असल्याची गावात जोरदार चर्चा अशी रंगली आहे . की हा ग्रामसेवक स्वतःला थेट बीडिओ समजतो की काय?काहीही समजत नाही…..
कारण त्याच्या वागण्या-बोलण्यातून आणि कामकाजाच्या पद्धतीतून असाच सूर उमटत आहे.
ग्रामस्थांच्या मते, हा ग्रामसेवक गावातील लोकांच्या समस्याकडे गांभीर्याने पाहत नाही. कोणतेही काम घेऊन गेले असता तो उडवा-उडवीची उत्तरे देतात. त्याचा कधी ऑफिसमध्ये हजेरी असते, कधी नसते, याचा काहीही ठावठिकाणा नसतो. नागरिकांनी फोन केला तरी तो फोन उचलत नाही. परिणामी सामान्यांना एका छोट्या कामासाठीसुद्धा अनेकवेळा कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एका ग्रामस्थाने घरकुल योजनेबाबत विचारणा केली असता, ग्रामसेवकाने त्यालाही सरळसोट उत्तर न देता टाळाटाळ केली. त्याच्या या वागण्यामुळे गावकऱ्यांचा रोष वाढत चालला आहे. सहीसाठी, शासकीय योजनांबाबत विचारण्यासाठी किंवा अर्जाबाबत विचारण्यासाठी कोणी गेले तरी ग्रामसेवकाचे वागणे ढवळाढवळ करणारे असल्याची चर्चा नागरिकांत आहे.
गावातील नागरिकांचा सवाल आहे की, ग्रामपंचायतीत बसून काम करण्यासाठी नियुक्त झालेला सचिव जर नागरिकांना टाळाटाळ करून वागणार असेल, फोन न उचलणार असेल, तर गावकऱ्यांनी जायचं कुठे?आणि या हा कर्मचारी काय कामाचा?
या सर्व प्रकारामुळे गावात प्रचंड नाराजीचे वातावरण असून, ग्रामसेवक एवढा बळ कुठून आणतो? कोणाचा आशीर्वाद मिळाल्याने तो अशा थाटात वागत आहे? अशा चर्चा सुरू आहेत. नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधत सांगितले की, या मनमानी कारभारावर तातडीने कारवाई करून ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा.
आता पाहावे लागणार आहे की वरिष्ठ अधिकारी या ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवतात का? की गावकऱ्यांचा रोष आणखी भडकतो















