Advertisement Advertisement

रात्री साडेनऊला तलवार घेऊन फिरताना पोलिसांच्या नजरेत आला; रायपूर पोलिसांचा दणका!

रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी येथे सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय तलवार बाळगणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नितीन दिगंबर डुकरे (रा. सावरगाव डुकरे, ता. चिखली) असे कारवाई झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रायपूर पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी सातगाव भुसारी येथे नितीन डुकरे हा तलवार बाळगताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याच्याकडून तलवार ताब्यात घेतली.

सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय शस्त्र बाळगणे तसेच लागू मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून नितीन डुकरे याच्याविरुद्ध रायपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास रायपूर पोलिस करीत आहेत.

ही कारवाई ठाणेदार नीलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दिलीप पडघान, पोलिस हेडकॉन्स्टेबल आशिष काकडे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल जाधव, अनंत कळमकर तसेच चालक पोलिस हवालदार लिंबाजी राठोड यांच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!