Advertisement Advertisement

रोही आडवा आला अन् माजी आमदारांची कार रस्त्याच्या कडाला पलटी! जलंब ते शेगाव रोडवरील घटना…

जलंब (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या कारला अपघात होऊन गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास जलंब ते शेगाव मार्गावरील कुरखेड फाट्यानजीक घडली. या अपघातात माजी आमदार देशपांडे यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार श्रीकांत देशपांडे हे आपल्या सहकाऱ्यांसह जलंब येथे एका अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते कारने शेगावकडे पुढील कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान, कुरखेड फाट्याजवळ अचानक एक रोही रस्त्यावर आडवा आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.

रोहीला धडक टाळण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमधील माजी आमदार देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अचानक रस्त्यावर आलेल्या रोहीमुळे हा अपघात घडल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्येही काही काळ खळबळ उडाली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!