Advertisement Advertisement

आईला लागली झोप, बाप उठला अन् पोरगी घरात नाय! १६ वर्षांची मुलगी बेपत्ता; अन् त्याच गावातला तरुण सुद्धा घरातून गायब….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गावातील १९ वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलगी रात्री सुमारे ११ वाजेपर्यंत आईसोबत घरात होती. त्यानंतर आईला झोप लागली. काही वेळाने वडील मोबाइल घेण्यासाठी उठले असता मुलगी घरात दिसून आली नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच गावातील परिसरात तिचा शोध घेतला; मात्र ती कुठेही आढळून आली नाही.

दरम्यान, गावातील अर्जुन हिवाळे (वय १९) हादेखील घरात नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांकडून समोर आले. त्याचा मोबाइलही बंद असल्याचे आढळले. मुलगी घरातून जाताना गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस आणि पांढऱ्या रंगाची चप्पल घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास दत्तात्रय नागरे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!