Advertisement Advertisement

आई उठली अन् पाहते तर मोठी पोरगी गायब! लोणवडीच्या वैष्णवीचा कुठं ठावठिकाणा लागेना; पोलिसांत मिसिंग दाखल!

आई उठली अन् पाहते तर मोठी पोरगी गायब! लोणवडीच्या वैष्णवीचा कुठं ठावठिकाणा लागेना; पोलिसांत मिसिंग दाखल!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील लोणवडी येथील १८ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे.

लोणवडी येथील सौ. शारदा बाबुराव सुरडकर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे घरकामासाठी उठल्या. त्यावेळी त्यांची मोठी मुलगी कु. वैष्णवी बाबुराव सुरडकर (वय १८ वर्षे) घरात दिसून आली नाही.

यानंतर शारदा सुरडकर आणि त्यांच्या पतीने घरात तसेच शेजारी, नातेवाईक आणि गाव परिसरात वैष्णवीचा शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे अखेर मलकापूर ग्रामीण पोलिसांत तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

वैष्णवीचे वर्णन

बेपत्ता झालेल्या वैष्णवीच्या अंगात पांढऱ्या रंगाचा टॉप असून त्यावर हिरव्या रंगाचे रेषांचे डिझाईन, काळ्या रंगाची सलवार आणि पायात कथ्थई रंगाच्या रबरी सँडल आहेत. तिच्या गळ्यात काळ्या रंगाच्या धाग्यात रुद्राक्ष आहे. तिचा रंग सावळा असून उंची सुमारे ५ फूट आहे.

या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी मिसिंग क्रमांक १८/२०२६ नुसार बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मपोहेका सविता मोरे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!