दारूच्या नशेत तिच्या घरी आला; घराच्या दरवाजाला लाथ मारून जबरदस्तीने आत प्रवेश केला…! तिचे तोंड दारू दाबून ….!

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील सुनगाव येथे एका २९ वर्षीय विवाहित महिलेवर घरात घुसून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर पीडितेला धमकावून गप्प बसवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपीविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजताच्या सुमारास पीडित महिला घरी एकटी असताना समीर अकबरखा तळवी (रा. सुनगाव) हा आरोपी दारूच्या नशेत तिच्या घरी आला. घराच्या दरवाजाला लाथ मारून जबरदस्तीने आत प्रवेश करत त्याने महिलेचे तोंड दाबून विनयभंगाचा प्रयत्न केला.

पीडितेने प्रतिकार केला असता आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या घटनेची वाच्यता कुणालाही केल्यास जीवे मारण्याची धमकी देत तो घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेनंतर पीडित महिलेने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या जबाबासह वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोपी समीर अकबरखा तळवी याच्याविरुद्ध बीएनएस कलम ६४(१), ७५(१), ३३३ व ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अधिकारी पोउपनि नागेश खाडे करीत आहेत. घटनेमुळे सुनगाव परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!