मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज):मोताळा तालुक्यात जळतन काढण्यासाठी गेलेल्या एका ५० वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला घराच्या पाठीमागे जळतन काढत असताना शेजारी राहणारा सुरेश ओंकार तायडे हा तेथे आला. “येथे आमचा पाइप आहे, तो फुटेल” असे सांगत त्याने जळतन काढण्यास विरोध केला. यानंतर आरोपीने वाईट उद्देशाने महिलेचा हात धरून तिचा विनयभंग केला तसेच अश्लील शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच पुन्हा जळतन काढण्यासाठी आली तर जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सुरेश तायडे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ विजय सुरळकर करत आहेत.











