बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जुन्या शेतीच्या वादातून वाद चिघळून वृद्ध शेतकऱ्यावर लाठी व काठ्यांनी हल्ला केल्याची घटना बुलढाणा शहरात घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशवंत तुकाराम चवरे (वय ७६, रा. बुलढाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवार २१ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास ते शेतात पाणी करून स्कुटीने घरी परतत होते. जेलच्या उत्तरेकडील रस्त्यावर आरोपी रवींद्र नरेंद्र भोंडे, नरेंद्र भोंडे तसेच त्यांचा नोकर (नाव अज्ञात) यांनी त्यांना अडवले.
“आमच्या शेतातून का गेलास?” असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ केली. त्यानंतर लाठी व काठ्यांनी चवरे यांच्या पायाच्या नळीवर तसेच डाव्या-उजव्या हातावर मारहाण करून त्यांना जखमी केले. यावेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.











