शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष; एकाचा मृत्यू, सात जखमींमध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक!

देऊळगाव महीत अज्ञात वाहनाच्या धडकेत ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :ग्राम नागापूर शिवारात शेतीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागापूर येथील सय्यद कुटुंब आणि अमडापूर व मंगरूळ नवघरे येथील नातेवाईकांमध्ये अंजनी बु. शिवारातील शेतीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादावरून दोन्ही गटांनी पुन्हा एकदा शेतात आमनेसामने येत परस्परांवर लोखंडी पाइप व काठ्यांनी हल्ला केला.

या हाणामारीत शेख अयाज शेख वाहेद (वय ३६, रा. अमडापूर) याचा जागीच मृत्यू झाला. तर रुजवानाबी जाबीर खान आणि जाबीर खान शब्बीर खान (रा. मंगरूळ नवघरे) गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याशिवाय आणखी पाच जणांना देखील गंभीर दुखापत झाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिसांनी नागापूर येथील संभाव्य आरोपींना ताब्यात घेतले असून उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत ठाण्यात तळ ठोकला होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!