खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) – शेगाव तालुक्यातील कालखेड येथे एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिव्या नीलेश हेलोडे (वय १४) हिने आज, २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता आपल्या घरात नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.
या घटनेची माहिती मिळताच गावात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेच्या वेळी दिव्याचे वडील शेतात फवारणीसाठी गेले होते, तर तिची आई वेगळी राहत असल्याचे सांगितले जाते. दिव्याला तीन भावंडे असून तिच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची तक्रार गावचे सरपंच पवन बारिंगे यांनी शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास बीट जमादार सुरेंद्र चव्हाण यांच्याकडे आहे.











