खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) शहरातील टिळक मैदानाजवळ रविवारी सकाळी भाजीच्या दरावरून झालेल्या वादातून महिला भाजी विक्रेती आणि तिच्या मुलाला मारहाण झाल्याची घटना घडली.
अमडापूर नाका, सजनपुरी येथील सविता सुरेश सपकाळ भाजी विक्री करत असताना, गोपाल भगवान शेळके (३६, रा. शिवाजी वेस) याने कमी दरात भाजी देण्याचा आग्रह धरला. सपकाळ यांनी नकार दिल्यावर त्याने वाद घालत त्यांच्यावर हात उगारला. एवढ्यावरच न थांबता आरोपीने प्रतिकार करणाऱ्या सपकाळ यांच्या हाताला चावा घेतल्याचे समोर आले आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या सपकाळ यांच्या मुलालाही आरोपीने मारहाण केली. याप्रकरणी सपकाळ यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी गोपाल शेळके याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.