चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून तब्बल १० लाख ४६ हजार रुपयांची लूट करणाऱ्या टोळीला अमडापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गजाआड केले. ही थरारक घटना १९ ऑगस्ट रोजी ईसोली–सावरखेड मार्गावर घडली.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ताडपत्रीच्या खरेदीवर मिळवा ५०% अनुदान, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!
चंद्रपूर जिल्ह्यातील राजेश महादेव नगराळे व गणेश भाऊराव मडावी या दोघांना स्वस्तात सोन्याच्या गिन्न्या मिळतील असे सांगून जानेफळ येथे बोलावण्यात आले होते. व्यवहारासाठी ते रक्कम घेऊन आल्यावर आरोपींनी कोयत्याच्या धाकाने त्यांना मारहाण केली आणि रोकड, मोबाइल, घड्याळ तसेच गाडीत असलेली रोख रक्कम हिसकावून पळ काढला.
या योजनेत मिळणार दरमहा ५००० रुपयांपर्यंत पेन्शनची हमी, पहा ऑनलाइन अर्जाची सोपी प्रक्रिया
तक्रार नोंदविल्यानंतर ठाणेदार निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ विशेष पथक तयार करण्यात आले. जलद कारवाई करत पोलिसांनी
- ईनेश सुभाष पवार,
- सुभाष रोहिदास पवार (दोघेही रा. दधम, ता. खामगाव) व
- उमेश छगन शिंदे (रा. धानोरी, ता. चिखली)
या तिघांना बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्यांना २३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईत भगवान शेवाळे, चंद्रशेखर मुरडकर, प्रदीप चोपडे, शिवाजी बिलगे, अच्युतराव सिरसाठ यांनी मोलाची भूमिका बजावली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.












