डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): परिसरातील अंजनी बुद्रुक येथे घरातून चालवल्या जात असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश करत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. अंजनी बुद्रुक येथे घरात देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली.
त्यानुसार मेहकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, लोणारचे ठाणेदार निमिष मेहेत्रे, मेहकरचे ठाणेदार आलेवार, डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे आणि पोलिस पथकाने शुक्रवार, दि. १८ जुलै रोजी पहाटे छापा टाकला. यावेळी शारदा त्र्यंबक नागोलकर (वय २९), कविता त्र्यंबकनागोलकर (वय ३१), वामन किसन लाड (वय ५५) आणि विजय दत्ता बोरकर (वय २५) या चार आरोपींना आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार करत असताना पथकाने रंगेहाथ पकड़ले. पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळावरून ९ हजार ६०० रुपये, ११ हजारांचे मोबाईल आणि यूपीआय स्कॅनर असे एकूण २१ हजार १०० रुपयांचे साहित्य जप्त केले.
या प्रकरणी ठाणेदार निमिष मेहेत्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनैतिक व्यवहार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. ठाणेदार अमरनाथ नागरे या प्रकरणाचा पुढील तपास करत मानवी प्रतिबंधक आहेत.
1 thought on “धक्कादायक..! घरात देह व्यापाराचा अड्डा; चौघांना अटक…”