“माझा पर्सनल नंबर घे आणि संपर्कात रहा,” असे म्हणत त्याने ….; चिखलीत महावितरण अभियंता अडचणीत! चिखली शहरातील घटना…

गावातील तलावावर धुणे धुण्यासाठी गेलेल्या पिडीत मुलीला एकटीला पाहून तिच्यासोबत...

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहरातील श्रीकृष्ण नगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्युत मीटर तपासण्याच्या बहाण्याने घरात घुसून सैनिकाच्या पत्नीशी अश्लील वर्तन करणाऱ्या महावितरणच्या भरारी पथकातील अभियंत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.आशिष देशमुख (रा. महावितरण, भरारी पथक, बुलढाणा) असे आरोपी अभियंत्याचे नाव असून ही घटना 18 जुलै रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.पीडित महिला घरी एकटी असताना आरोपीने अचानक घरी प्रवेश केला आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

“माझा पर्सनल नंबर घे आणि संपर्कात रहा,” असे म्हणत त्याने वाईट उद्देशाने तिच्यावर दबाव आणला. महिलेला हे वर्तन खटकल्याने तिने विरोध केला असता आरोपीने तिला दमदाटी केली.या घटनेनंतर पीडितेने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आशिष देशमुखविरोधात अप. क्र. 554/25, कलम 333, 78(2), 351(2) बिएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.विशेष म्हणजे, पीडितेचा पती सध्या जम्मू-कश्मीर मध्ये भारतीय सैन्यात कार्यरत आहे.

या प्रकारामुळे चिखलीत खळबळ उडाली असून महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!