POLITICAL NEWS : डॉ राजेंद्र शिंगणे यांनी बोलावली सिंदखेड राजा येथे कार्यकर्त्याची महत्त्वाची बैठक! पक्षसंघटना मजबूत करण्याचा निर्धार?

सिंदखेडराजात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी डॉ. राजेंद्र शिंगणेंचा एल्गार; १४ जुलैला भव्य मोर्चाचे आयोजन, राज्य सरकारला विचारणार जाब!

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे विदर्भ प्रभारी आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शनिवारी, २८ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता सिंदखेड राजा येथील पंचायत समिती सभागृहात एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाच्या आगामी निवडणूक रणनीतीसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

डॉ. शिंगणे यांनी यापूर्वी सिंदखेड राजा मतदारसंघातून पाच वेळा आमदारकी भूषवली आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत मतविभाजनामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता या चुका सुधारण्यासाठी आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ते कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करणार आहेत. या बैठकीत बूथ पातळीपासून नेतृत्वापर्यंत संघटना मजबूत करणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पक्षाची ठाम भूमिका मांडणे, कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवणे आणि अंतर्गत मतभेद मिटवून एकसंघ लढा उभारण्यावर भर दिला जाणार आहे.

शरद पवार यांनी डॉ. शिंगणे यांना निर्णयाची पूर्ण मुभा दिल्याने, आघाडीत सामील होण्याचा की स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा याबाबत अंतिम निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे केवळ कार्यकर्त्यांचेच नव्हे, तर विरोधी पक्षांचेही लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!