रात्री ती झोपली,सकाळी पाहील तर गायब झाली..! खामगावमध्ये १५ वर्षीय मुलगी फुस लावून पळवली; खामगाव पोलिस ठाण्यात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल!

तू मला खूप आवडतेस, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, माझ्यासोबत रहा: अस म्हणत लग्न झालेल्या महिल्यासोबत अश्लील चाळे....

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरातील शंकर नगर परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १४ मेच्या मध्यरात्री घडली असून, याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रतीक गजानन सोनोने (वय २७, रा. शंकर नगर) याने मुलीस फुस लावून नेले आहे. मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रतीक सोनोनेविरुद्ध POCSO कायदा (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) आणि अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!