Advertisement Advertisement

वरखेडची १८ वर्षांची पोरगी घरातून गायब! कुठं गेली पुनम? अज्ञात व्यक्तीने पळविल्याचा संशय; पोलिसांत गुन्हा दाखल…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील १८ वर्षीय युवती घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. युवतीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला असून, त्यांच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दीपक विश्वनाथ सपकाळ (रा. वरखेड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांची मुलगी पुनम दीपक सपकाळ (वय १८) ही घरी आढळून आली नाही. तिचा गावात तसेच इतर ठिकाणी शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही.

अखेर अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करत वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!