Advertisement Advertisement

अंचरवाडीच्या वसंत नगर तांड्यात खळबळ! ४५ वर्षीय महिला दोन दिवसांपासून घराबाहेर! कुटुंबीयांची शोधाशोध सुरूच होती! सकाळी शेतात गेल्यावर समोर आलं धक्कादायक वास्तव!

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील वसंत नगर तांड्यात ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. संगीता दिलीप राठोड असे मृत महिलेचे नाव असून, त्या स्वतःच्या शेतात मृतावस्थेत आढळून आल्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अंढेरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता राठोड या दोन दिवसांपूर्वी शेतात कामाला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, १० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास स्वतःच्या शेतातील सागाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्या आढळून आल्या.

या प्रकरणी त्यांचे पुत्र राहुल दिलीप राठोड (वय २८) यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (मर्ग) नोंद केली आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!