खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेगाव तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिलेचा वारंवार पाठलाग करणे, तिच्याकडे वाईट नजरेने पाहणे तसेच घरात घुसल्याचा आरोप असलेल्या समाधान महादेव देवकर (वय ४३, रा. शेगाव) याच्याविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आरोपी तिच्या घरात घुसल्याचा आरोप आहे. तसेच तो वारंवार तिचा पाठलाग करीत असे आणि घराच्या माडीवर चढून तिच्याकडे पाहत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ७४, ७८, ३३१ (३) आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश हिवाळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.












