Advertisement Advertisement

लग्नाला न बोलावल्याचा राग अन् दोन गावांत हाणामारी! वाघूळ-खैरव येथे परस्परविरोधी तक्रारी; आठ जणांवर गुन्हे दाखल, एक जखमी जालना येथे उपचारासाठी हलविला…

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लग्नाला न बोलावल्याच्या कारणावरून वाघूळ व खैरव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाद होऊन मारहाणीच्या घटना घडल्या. या दोन्ही प्रकरणांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर अंढेरा पोलिसांनी एकूण आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

वाघूळ येथील घटनेत चौघांवर गुन्हा : अंढेरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघूळ येथील बाळू रवींद्र काकडे (वय ३५) हे फौजी असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, खैरव येथील लग्नाला न बोलावल्याच्या कारणावरून २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४ ते ४.३० वाजेच्या दरम्यान त्यांच्या भाऊ सतीश काकडे याला आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. भाऊला मारहाण होत असल्याचे पाहून बाळू काकडे तेथे गेले असता त्यांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेत जखमी झालेल्या सतीश काकडे यांना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी बाळू रवींद्र काकडे यांच्या फिर्यादीवरून योगेश अशोक बर्डे, गणेश अशोक बर्डे, गोपाल बबन माळी (सर्व रा. वाघूळ) आणि सोनू पंजाब बर्डे (रा. केशव शिवनी) यांच्याविरुद्ध BNS कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खैरव येथील घटनेत चौघांवर कारवाई : दुसऱ्या घटनेत खैरव येथील निवृत्ती बद्रीनाथ सोसे (वय २५) यांनी अंढेरा पोलिसांत तक्रार दिली. फिर्यादी हे फौजी असून सुट्टीवर घरी आले होते. लग्नाला न बोलावल्याच्या कारणावरून आरोपी क्रमांक एकने शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. तसेच फिर्यादीच्या आईसोबत झटापट करून तिचा पदर ओढला आणि फिर्यादीच्या कपाळावर काठीने मारून जखमी केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यावेळी घटनास्थळी आलेल्या इतर आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या तक्रारीवरून मनोहर नंदाजी सोसे, नंदाजी दगडूजी सोसे, रामकोर नंदाजी सोसे आणि विजय नंदाजी सोसे (सर्व रा. खैरव) यांच्याविरुद्ध BNS कलम ७४, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही घटनांप्रकरणी अंढेरा पोलिसांनी गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. फिर्यादींच्या तक्रारी आणि त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आरोपांच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!