Advertisement Advertisement

अवघं १५ वर्षांचं कोवळं वय…हातात वह्या-पुस्तकं, डोळ्यांत भविष्याची स्वप्नं… पण नियतीने घात केला; जयश्रीच्या मृत्यूने पळशी सुपो हादरलं!

अवघं १५ वर्षांचं कोवळं वय…हातात वह्या-पुस्तकं, डोळ्यांत भविष्याची स्वप्नं… पण नियतीने घात केला; जयश्रीच्या मृत्यूने पळशी सुपो हादरलं!

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील रामनगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचा १९ सप्टेंबर रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. जयश्री कडू अंभोरे (रा. पळशी सुपो) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री ही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ती घरात असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

यानंतर जयश्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर तिच्यावर पळशी सुपो येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जयश्रीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेमुळे कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!